मुलींना महाराष्ट्र सरकार देणार 1 लाख 1 हजार रुपये!!महाराष्ट्र लेक लाडकी योजना!!

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024:

जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासना कडून 1 लाख 1000 रुपयांची संपूर्ण आर्थिक मदत मिळवू शकता.महाराष्ट्रची लेक लाडकी योजना यासाठी तुम्हाला काही पात्रता  पूर्ण कराव्या लागतील.Maharstra lek ladki yojana

महाराष्ट्राची लेक लाडकी योजना मुलींच्या जन्मापासून ते मुलगी  18 वर्षांची होईपर्यंत तिच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी 101,000 रुपये देते. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि त्याचे फायदे मिळवायचे असतील, तर या मंध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.  पात्रता, निकष आणि अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पुढ स्पष्ट केली आहे.

काय आहे ही महाराष्ट्र लेक लडकी योजना?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील मुलींना आरोग्य, पोषण आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये , जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षे पर्यंत सर्व पात्र मुलींना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 101,000 रुपये देण्याची यवस्था शाशन करत आहे. ज्याची सुरुवात मुलीच्या जन्मानंतर पहिला हप्ता 5,000 रुपये देण्यापासून होते.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना समाजातील मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते . या योजने ने मिळणारी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एकूण पाच हप्त्यांमध्ये पाठवली जाते. ज्यामध्ये पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपयांपासून सुरू होतो आणि 75000 रुपयांचा शेवटचा हप्ता मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो . या योजनेची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्प मध्ये केली होती. ऑनलाइन अर्ज सध्या स्वीकारले जात नसले तरी, कोणतीही पात्र व्यक्ती अर्ज डाउनलोड करून ऑफलाइन अर्ज करू शकते.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये:

  • या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाच म्हणजे या कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार.
  • मुलीच्या जन्म नंतर लगेच 5000₹ ची रक्कम तिच्या पालकांना मिळणार.
  • दुसरा हप्ता मुलगी पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्या नंतर 4000₹ पालकांच्या खात्या मध्ये जमा केले जातील.
  • तिसरा इन्स्टॉलमेन्ट  मुलगी 6 व्या वर्गात गेल्या नंतर ₹6000 चा दिला जातो.
  • 8000₹ चा चोथा हप्ता मुलीने 11वी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर मिळतो.
  • शेवटचा आणि पाचवा हप्ता मुलीच्या उच्य शिक्षण आणि लग्नासाठी 75000₹ मुलीच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यावर दिला जातो.

महाराष्ट्रची लेक लाडकी योजना साठी पात्रता :

  1. अर्ज करणारी /करणारा महाराष्ट्र चा रहिवाशी असला पाहिजे.
  2. केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच या योजने  साठी पात्र राहतील.
  3.  मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 1 लाख पेक्षा अधिक असू नये.
  4. या योजनेचा लाभ घेण्या साठी मुलगी ही  1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेली पाहिजे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :

  • मुलीच्या आई /वडील यांचा आधार कार्ड.
  • पिवळे /केशरी रेशन कार्ड.
  • राहिवशी प्रमाण पत्र.
  • उत्पन्न दाखला.
  • Bank खाते पासबुक.
  • मुलींचा आई-वडील  सोबत चा फोटो.
  • मुलीचा पासपोर्ट फोटो.
  • चालू मोबाईल नंबर.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?:

महाराष्ट्र सरकार कडून या योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाहीकिंवा ऑफिसिअल वेबसाईट नाही.पण पात्र उमेदवार या साठी ऑफ लाईन अर्ज करू शकतो. या साठी पुढली प्रकीऱ्या करावी लागेल.

  • आपल्या जवळच्या बालवाडी किंवा अंगणवाडी शी सम्पर्क करावा लागेल.
  • इथून आपल्याला महाराष्ट्र लेक लाडकी योजना चा अर्ज फॉर्म मिळेल.
  • मिळालेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक अशी भरावी लागेल.
  • त्या नंतर आवश्यक कागद पत्र या सोबत जोडावी लागतील.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर बालवाडी /अंगणवाडी केंद्र मध्ये जमा करावा लागेल.
  • अर्जाची सत्यता पडताळून झाल्यावर योजनेची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल.

विशेष नियम :

  • जुळ्या मुली जन्माला  आल्या तर दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
  • जुळ्या बाळामध्ये जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला ही योजना लागू होईल.
  • 1एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत.

याची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Read more

error: Content is protected !!