स्टँड अप इंडिया योजना:Stand Up India Yojanaमहिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे.
Stand up india yojana ही योजना सुरू करण्यामागे महिलांचा सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.
स्टँड अप इंडिया स्कीम असे या योजनेचे नाव आहे. स्टँड-अप इंडिया योजना महिला उद्योजकांना आणि समाजातील SC/ST प्रवर्गातील लोकांना निधी किंवा कर्ज पुरवठा करते.
Stand up india yoj anaमध्ये आर्थिक मदत दिली जाते:
स्टँड-अप इंडिया योजना भारत सरकारने प्रामुख्याने SC/ST श्रेणीतील लोकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली होती.
या योजनेचा उद्देश प्रत्येक बँकेच्या शाखेतून किमान एका SC/ST अर्जदाराला 10 लाख ते र 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे आहे.
Stand up india yojana 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध:
या योजनेअंतर्गत सरकार त 10 लाख ते 1 कोटी रुपयां पर्यंतचे कर्ज देते.
स्टँड-अप इंडिया योजना भारतातील सूचीबद्ध व्यावसायिक बँकांच्या सर्व शाखांद्वारे चालविली जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश सेवा, उत्पादन आणि व्यापार क्षेत्रात सेवा देणाऱ्या उद्योगांना आर्थिक सहाय्यता प्रदान करणे आहे.
गैर-वैयक्तिक उपक्रमांमध्ये किमान 51% नियंत्रण आणि भागीदारी एकतर महिला अर्जदाराकडे किंवा SC/ST प्रवर्गातील व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे.
स्टँड अप इंडिया(STAND UP INDIA) योजनेची वैशिष्ट्ये:
- लागू व्याज दर त्या श्रेणीसाठी बँकेद्वारे ठरवले जाते, जे MCLR + 3% + मुदतीच्या प्रीमियमपेक्षा जास्त असेल.
- अनुसूचित जाती/अनुसूचित (SC/ST)जमातीचे लोक आणि महिला अर्जदारांसाठी स्टँड अप स्कीम अंतर्गत कर्ज घेण्यासाठी वयाची 18 वर्षे वय निश्चित करण्यातआले आहे.
- ग्रीन फील्ड प्रकल्पांसाठी कर्ज फक्त त्या उदयोजकांना दिले जाते जे पहिल्यांदाच या उत्पादन किंवा व्यापार क्षेत्रात व्यवसाय करत आहेत.
- अर्जदाराचे कोणत्याही बँक शाखेत किंवा NBFC मध्ये डीफॉल्ट रेकॉर्ड नसावे.
- एकूण कर्जाची रक्कम (ज्यात मुदत कर्ज आणि खेळते भांडवल समाविष्ट आहे) 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान ऑफर केली जात आहे.
- बँकांनी व्यवस्था केलेली कर्जे क्रेडिट गॅरंटी फंड योजनेच्या हमीद्वारे संरक्षित आहेत.
- अनुसूचित जाती/जमाती(SC/ST )आणि महिला उद्योजकांसाठी कर्जाचा वापर केवळ व्यापार, सेवा आणि उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जाऊ शकतो.
- कर्जाचा कालावधी कमीत कमी 7 वर्षे आणि जास्तीत जास्त स्थगिती कालावधी 18 महिने आहे.
STAND UP INDIA YOJANA कर्ज घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे:
- पासपोर्ट फोटो.
- ओळख पत्र.
- राहिवाशी दाखला.
- व्यवसाय करण्याच्या ठिकाण चा पता.
- कंपनीचे मेमोरँडम ऑफ असोसिएशन.
- भागीदारी करार.
- भाडेपट्टीची छायाप्रत किंवा झेरॉक्स.
- भाडे करार पत्र.
- मागील ३ वर्षांचा ताळेबंद म्हणजेच बैलेंस शीट.
- प्रमोटर आणि हमीदार यांचे मालमत्ता आणि लाइबिलिटी स्टेटमेंट.
अशा प्रकारे कर्जासाठी नोंदणी अर्ज करा:
- नोंदणी करण्यासाठी stand up india च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- सर्व प्रथम, नोंदणी फॉर्म व्यवसाय कॉलममध्ये भरावा लागेल.
- त्या नंतर तुम्हाला निवडावे लागेल की तुमचा प्रवर्तक महिला वर्गातील आहे की SC/ST प्रवर्गातील आहे आणि व्यवसायात 51% किंवा त्याहून अधिक भागीदारी आहेका?
- अर्जदाराने प्रथमच उद्योजकांसाठी योजना, व्यवसायाचे स्वरूप, कर्जाची रक्कम, व्यवसाय करायचे स्वरूप आणि माहिती, व्यवसायाचे स्थान आणि ड्रॉप डाउन निवडणे आवश्यक आहे.
- त्या नंतर तुम्हाला तुमच्या मागील व्यावसायिक अनुभवाची वर्षांची व्यावसायिक कार्याची , व्यवसायाचा अनुभव आणि प्रकार यांचा उल्लेख करून माहिती द्यावी लागेल.
- हँड होल्डिंग सपोर्टला हवे तसे टिक करावे लागेल.
- त्या नंन्तर अर्जदाराला त्याची वैयक्तिक माहिती द्यभरावी लागेल.
- शेवटी रजिस्टर करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- यानंतर, अधिक माहितीसाठी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.