“RASHTRIYA MILITARY SCHOOLS “मध्ये वर्ग 6 वी आणि वर्ग 9 वी थेट प्रवेश!!!

“RASHTRIYA MILITARY SCHOOLS” म्हणजेच ‘राष्ट्रीय सैनिकी शाळा ‘ मध्ये वर्ग 6 वी आणि 9 वी मध्ये थेट प्रवेश परीक्षा 2025!!

“RASHTRIYA MILITARY SCHOOLS” म्हणजेच ‘राष्ट्रीय सैनिकी शाळा ‘ मध्ये वर्ग 6 वी आणि 9 वी मध्ये थेट प्रवेश साठी प्रवेश परीक्षा 2025 ची जाहिरात आली आहे. काय आहे ही प्रवेश प्रकिर्या याची संपूर्ण माहिती आपण पुढली लेखात घेणार आहोत.

चैल (हिमाचल प्रदेश), अजमेर (राजस्थान), बेळगाव (कर्नाटक), बेंगळुरू (कर्नाटक) आणि ढोलपूर (कर्नाटक) येथे असलेल्या राष्ट्रीय सैनिकी शाळांमध्ये इयत्ता 6 वी (मुले आणि मुली) आणि इयत्ता 9 वी (मुले आणि मुली) च्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय सैनिकी शाळा या CBSE शी संलग्न पूर्णपणे निवासी (सार्वजनिक शाळा) public schools आहेत, आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत.

RASHTRIYA MILITARY SCHOOLS पात्रता :

1.वय :

इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 मार्च 2025 रोजी 10-12 वर्षे वयोगटातील मुले आणि मुली यासाठी पात्र असणार आहेत.01 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 दरम्यान जन्मलेले, मुले आणि मुली 6 वित प्रवेश पात्र आहेत.

तर इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 मार्च 2025 रोजी 13-15 वर्षे वयोगटातील मुले आणि मुली पात्र ठरतील.01 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012 दरम्यान जन्मलेले, मूल -मुली या साठी पात्र आहेत.

इयत्ता VI आणि इयत्ता IX च्या प्रवेशासाठी युद्ध कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वॉर्डसाठी म्हणजेच मुला-मुली साठी उच्च वयोमर्यादेत सहा महिन्यांची सूट देण्यात आली आहे.

2.शैक्षणिक पात्रता:
  • इयत्ता सहावी वर्गात उमेदवाराने प्रवेशाच्या तारखेपूर्वी सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता पाचवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • इयत्ता पाचवीत शिकणारे विद्यार्थीही सहावीच्या प्रवेश परीक्षेला बसण्यास पात्र आहेत.
  • इयत्ता नववी वर्गात उमेदवाराने प्रवेशाच्या तारखेपूर्वी सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थीही नववीच्या प्रवेश परीक्षेला बसण्यास पात्र आहेत.
3.प्रवेश परीक्षा :

इयत्ता VI आणि IX च्या प्रवेशासाठी मल्टिपल चॉईस OMR आधारित कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) ची तारीख सर्व उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर अनुक्रमे ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठविली जाईल.

याशिवाय, याची माहिती RASHTRIYA MILITARY school च्या अधिकृत वेबसाईट वर ही वेळो वेळी उपलब्ध करून दिली जाईल.

RASHTRIYA MILITARY school रिक्त पदांचे आरक्षण:

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या JCOs आणि माजी सैनिक च्या वार्डांसाठी म्हणजेच मुला मुली साठी 70% राखीव जागा असतील

तर लष्कर, नौदल आणि हवाई दल च्या निवृत्त अधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या पाल्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रभागांसाठी 30%जागा राखीव असतील .

कोणत्याही वेळी सर्व पाच RASHTRIYA MILITARY school मध्ये “किल्ड इन ॲक्शन” श्रेणीसाठी म्हणजेच शहीद साठी एकत्रित सर्व वर्गांमध्ये जास्तीत जास्त 50 जागा निश्चित केल्या आहेत.
Sc/St/Obc सर्व श्रेणींमध्ये अनुक्रमे 27%, 15% आणि 7.5% जागा राखीव असतील.

याची सर्व माहिती आणि सत्यता पडताळणी साठी RASHTRIYA MILITARY school च्या ऑफिसिअल वेबसाईट आणि जाहिरात याचा अभ्यास अवश्य करावा.

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

RASHTRIYA MILITARY school अर्ज करण्याची शेवट ची तारीख:

RASHTRIYA MILITARY school च्या वर्ष 2025-26 च्या शैक्षणिक वर्ष साठी इयत्ता VI आणि IX च्या प्रवेशासाठी CET अर्ज भरण्याची शेवट ची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!