Railway NTPC Recruitment :10884 पदासाठी आली जाहिरात!!!!

Railway NTPC Recruitment :10884 पदासाठी आली जाहिरात!!!!

भारतीय रेल्वेने 10884 पदासाठी काढली भरती.Railway NTPC Recruitment साठी शॉर्ट नोटिफिकेशन  जाहिरात  काढली आहे.12वी पास आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

रेल्वे  ने NTPC भरतीसाठी 10884 पदांची शॉर्ट नोटीस जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या मध्ये स्टेशन मास्टर, तिकीट पर्यवेक्षक, तिकीट लिपिक, गार्ड आणि लिपिक यासह विविध पदां साठी अर्ज मागवण्यात येणार आहेत.

रेल्वे भरती बोर्ड ने NTPC म्हणजेच नॉन-टेक्निकल  श्रेणीतील  पदांसाठी  बंपर भरतीसाठी एक छोटी जाहिरात म्हणजेच शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत, रेल्वेमध्ये दोन स्तरांवर भरती केली जाईल.पहिला स्तर 12 वी उत्तीर्ण आणि दुसरा स्तर पदवीधर उमेदवार साठी असणार आहे. रेल्वे वोर्कशॉप म्हणजेच रेल्वे कारखाना युनिट  मध्ये 154 पदे आणि विभागीय रेल्वे म्हणजेच झोन मध्ये 10730 पदे भरली जातीलअशी माहिती दिली आहे.

Railway NTPC Recruitment विभाग नुसार  जागा :

  • अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट =361जागा.
  • कमर्शियल कम टिकट क्लर्क =1985जागा.
  • जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट =990 जागा.
  • ट्रेन क्लर्क=68जागा.
  • गुड्स ट्रेन मैनेजर=2684जागा.
  • स्टेशन मास्टर=963जागा.
  • चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवाइजर=1737जागा.
  • जूनियर अकाउंट्स असिस्टेंट कम टाइपिस्ट=1371जागा.
  • सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट =725जागा.

Railway NTPC Recruitment अर्ज फी/शुल्क :

  • सामान्य/EWS /OBC साठी 500 रुपये परीक्षा फीस भरावी लागेल.
  • SC/ST/महिला/माजी सैनिक /EBC/PWD उमेदवारासाठी 250 रुपये शुल्क भरावा लागेल.

परीक्षा फी/शुल्क परतावा :

सामान्य /EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना CBT 1 मध्ये उपस्तीथी नंतर 400 रु परतावा मिळेल.

SC/ST/ PWD EBC/माजी सैनिक यांना CBT 1 मध्ये उपस्तीथी नंतर 250रु म्हणजेच पूर्ण फीस परत मिळेल.

वयोमर्यादा :

  • Railway NTPC Recruitment या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आहे आणि पदांनुसार कमाल वय वेगळे ठेवण्यात आले आहे.याची संपूर्ण माहिती उमेदवारांना ऑफिसिअल जाहिराती मध्ये पाहावी लागेल.

शैक्षणिक पात्रता :

Railway NTPC Recruitment या भरतीमध्ये लेखा लिपिक सह टंकलेखक, कमर्शियल कम तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि ट्रेन लिपिक या पदांसाठी उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तर गुड्स ट्रेन मैनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवाइजर, जूनियर अकाउंट्स असिस्टेंट कम टाइपिस्ट, सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट पदा साठी उमेदवार हा पदवीधर असला पाहिजे.

Railway NTPC Recruitment निवड प्रकिऱ्या :

रेलवे एनटीपीसी भरती साठी उमेदवारांना CBT1,CBT2 या संगणक आधारित परीक्षा बरोबरच स्किल टेस्ट, कागदपत्र पडताळणी, आणि वैद्यकीय चाचणी या सर्वाना सामोरे जावे लागेल.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

  • रेल्वे एनटीपीसी भरतीसाठी, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांना अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्या आधीप् संपूर्ण अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल आणि नंतर  Apply लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, त अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल.
  • त्यानंतर  आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
  • त्यानंतर  प्रवार्गा नुसार अर्जाची फी/शुल्क भरावी लागेल.
  • भरलेली माहिती, फॉर्म शेवटी सबमिट करावा लागेल.
  • भरलेल्या फॉर्म ची प्रिंटआउट काडून  ती पुढली कामासाठी आपल्या कडे ठेवावी.

Railway NTPC Recruitment::

रेल्वेने 10884 पदांसाठी NTPC भरतीची छोटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  तपशीलवार जाहिरात देखील लवकरच प्रसिद्ध केली जाईल.त्या RRB  ची अधिकृत वेबसाईट तपासत राहिले पाहिजे.

ऑफिशियल नोटिफिकेशन:डाउनलोड करा 

अधिक माहिती साठी :क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!