INDIAN Railway Junior Engineer Recruitment :कनिष्ठ अभियंता 7934 रिक्त पदे !

भारतीय रेल्वेने कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Recruitment ) 7934 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली  आहे, यासाठी अर्ज  करण्यासाठी 29 ऑगस्ट पर्यंत शेवट ची तारीख.

रेल्वे भरती बोर्ड ने कनिष्ठ अभियंता(Junior Engineer recruitment )या पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे, या भरतीसाठी महिला आणि पुरुष उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकता.भारतीय रेल्वे कनिष्ठ अभियंता पद  फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट 30 जुलैपासून सुरू होईल आणि शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 ही राहील .

RRB द्वारे भरती रोजगार सूचना 03/2024 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.7व्या पे कामिशन अनुसार पे मॅट्रिक्स लेव्हल पद 6 अनुसार 35400 रुपये  वेतन मनानुसार पगार दिला जाईल. याची माहिती उमेदवारांना अधिकृत जाहिरातीनुसार झोन निहाय आणि श्रेणीनुसार रिक्त जागा किती आणि कुठे आहेत हे कळू शकते.

रेल्वे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer recruitment ) अर्ज शुल्य /फी:

  • रेल्वे जेई भरती साठी UR, OBC आणि EWS प्रवर्ग साठी अर्ज शुल्क 500 रुपये  आहे.
  • या मध्ये  पहिल्या टप्प्याच्या परीक्षा CBT दिल्या नंतर 400 रुपये परतावा दिला जाईल.
  • ST (अनुसूचित जाती),ST( अनुसूचित जमाती), माजी -सैनिक ,  ट्रान्सजेंडर आणि सर्व महिलांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे.
  • त्यांनाही पहिल्या टप्प्यातील CBT परीक्ष नंतर  250 रुपये अर्ज शुल्क परत केले जाईल.

 रेल्वेकनिष्ठ अभियंता (Junior Engineer recruitment)वयोमर्यादा :

  • या पदासाठी साठी उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 36 वर्षे आहे.
  •  1 जानेवारी 2025 ही तारीख आधार मानून वयाची गणना केली जाईल.
  • शासनाच्या नियमांनुसार आरक्षण प्रवार्गनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल

JUNIOR ENGINEER RECRUITMENT शैक्षणिक पात्रता:

या पदासाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील/विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठतील BE, B.Tech किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

उमेदवार अधिकृत जाहिराती मधून शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकतो.

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणकावर आधारित पहिली CBT परीक्षा, दुसरी CBT परीक्षा त्या नंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या आधारावर केली जाईल.Junior Engineer Recruitment

 या पदासाठी आवेदन प्रक्रिया:

रेल्वे कनिष्ठ अभियंता पदासाठी  उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी  संपूर्ण अधिकृत जाहिरात RRB च्या वेबसाईट वर जाऊन पाहावी लागेल.

त्या नंतर रजिस्टर लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती अचूक अशी भरावी लागेल.

उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल.

त्यानंतर, त्यांना त्यांच्या श्रेणीनुसार/पदानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

अर्ज फॉर्म, शेवटी सबमिट करून आणि त्याची प्रिंट काढून भविष्यातील प्रकिर्ये साठी सुरक्षित ठेव्हावी लागेल.

परीक्षेचा अभ्यासक्रम :

CBT 1 आणि CBT 2या संगणक आधारित परीक्षे साठी चा अभ्यासक्रम रेलवे बोर्ड च्या अधिकृत जाहिरात आणि वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी :क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!