MAHA TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024!
Maha tet महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे,या कार्यालयावर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ‘शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.MAHA TET
‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येईल. अशी घोषणा शासनाने केली आहे.
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विनाअनुदानित, कायम विन अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ‘ पास होणे अनिवार्य आहे.
या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय, परीक्षा पद्धती, शासनाने वेळोवेळी काढलेल्या सूचना याची विस्तारित माहिती ‘ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ‘ च्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.MAHA TET
ऑनलाइन अर्ज,परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज शुल्क याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
ऑनलाइन अर्ज तारीख :
‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ चे वेळापत्रक :
- ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची वेळ 9 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 असणार आहे.
- प्रवेश पत्र मिळण्यास सुरुवात होण्याची तारीख 28 ऑक्टोबर 2024.
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी दोन सत्रात घेण्यात येईल.
- काही कारणास्तव वेळापत्रक बदलण्याची संभावना असल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषद च्या अधिकृत वेबसाईट वर वेळो वेळी अपडेट दिला जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करन्यासाठी महत्वाच्या सूचना :
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024′ ची सर्व माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषद च्या अधिकृत वेबसाईट वर मिळेल.
- Online अर्ज करताना पत्र उमेदवारांनी सर्व आवश्यक शैक्षणिक कागद पत्र, जातीचा दाखला इत्यादी स्कॅन करून जवळ बाळगावे.
- सर्व मूल प्रमाणपत्र online अर्ज करताना अपलोड करावी लागतील.
- महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषद पात्र उमेदवारांना संपर्क करण्या साठी SMS , ई मेल याचा वापर करणार त्या मुळे उमेदवारकडे मोबाईल नंबर आणि ई मेल id असणे गरजेचे असणार आहे.
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा साठी केवळ online पद्धतीने अर्ज करता येईल.
- ऑफ लाईन अर्ज सुविकारले जाणार नाहीत.
- अर्ज शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, upi ने भरता येईल.
- परीक्षेच्या निकाला नंतर मूळ कागद पत्र पडताळणी केली जाईल.