CTET 2024: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024!

CTET 2024: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024!

CTET 2024 सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने CTET म्हणजेच ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024’ ही डिसेंबर 2024 ला घेणार आहे.

CTET म्हणजेच Central Teacher Eligibility Test होय.CBSE बोर्डने ही परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मिठी संधी मिळणार आहे.

महत्वाची माहिती :

शैक्षणिक पात्रता :

प्रथमिक गट : 50% गुणांसह 12 वि उत्तीर्ण आणि D. Ed झालेला पाहिजे.

माध्यमिक गट :पदवी 50% गुण  आणि B. Ed असणे महत्वाचे आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत करता येतील तर परीक्षा ही 1 डिसेंबर 2024 घेतली जाईल.

परीक्षा शुल्क /फीस :

  • समान्य / OBC साठी 1200 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
  • SC/ST/PWD साठी 600 रुपये फीस भरावी लागेल.
  • अधिक माहिती साठी जाहिरात पाहावी, ही विनंती.

CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे संपूर्ण भारतातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पात्रता प्रमाणित करण्यासाठी आयोजित केलेली राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा आहे.

ज्या उमेदवारांनी त्यांचे वरिष्ठ माध्यमिक म्हणजेच 12  वी किंवा समतुल्य किमान ५०% गुणांसह पूर्ण केले आहे, आणि उत्तीर्ण झाले आहे.

प्राथमिक शिक्षणातील 2 वर्षांचा डिप्लोमा / 4-वर्ष प्राथमिक शिक्षण पदवी (B.El.Ed.) च्या अंतिम वर्षात प्रवेश केला आहे. / 2 वर्षांचा डिप्लोमा इन एज्युकेशन (विशेष शिक्षण)  केला असेल तर तो या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

परीक्षा पद्धती :

  • सीटीईटी दोन पेपरमध्ये घेतली जाते.
  • पेपर I आणि पेपर II.
  • पेपर I हा इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.
  • तर पेपर II इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.
  • दोन्ही पेपर्समध्ये बहुपर्यायी प्रश्न आहेत.
  • परीक्षा साठी  अडीच (2.5) तासांच्या कालावधी असणार आहे..
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही.

अर्ज प्रक्रिया:

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे CTET साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी आवश्यक माहिती भरून आणि  कागदपत्रे अपलोड करून स्वतःचे रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

परीक्षेसाठी अर्ज शुल्क श्रेणी आणि अर्ज केलेल्या पेपरनुसार बदलते आणि उमेदवार नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे फी ऑनलाइन भरू शकतात.

प्रवेशपत्र:

CTET चे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर पात्र उमेदवारांना डाओनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेणे आणि प्रिंट काढणे आवश्यक आहे.

परीक्षेचा निकाल/परिणाम:

CTET चे निकाल सामान्यतः अधिकृत वेबसाइटवर घोषित केले जातील. 

परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्र दिले जाते, जे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून 7 वर्षांसाठी वैध राहते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top