Railway NTPC Recruitment :10884 पदासाठी आली जाहिरात!!!!
भारतीय रेल्वेने 10884 पदासाठी काढली भरती.Railway NTPC Recruitment साठी शॉर्ट नोटिफिकेशन जाहिरात काढली आहे.12वी पास आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
रेल्वे ने NTPC भरतीसाठी 10884 पदांची शॉर्ट नोटीस जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या मध्ये स्टेशन मास्टर, तिकीट पर्यवेक्षक, तिकीट लिपिक, गार्ड आणि लिपिक यासह विविध पदां साठी अर्ज मागवण्यात येणार आहेत.
रेल्वे भरती बोर्ड ने NTPC म्हणजेच नॉन-टेक्निकल श्रेणीतील पदांसाठी बंपर भरतीसाठी एक छोटी जाहिरात म्हणजेच शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत, रेल्वेमध्ये दोन स्तरांवर भरती केली जाईल.पहिला स्तर 12 वी उत्तीर्ण आणि दुसरा स्तर पदवीधर उमेदवार साठी असणार आहे. रेल्वे वोर्कशॉप म्हणजेच रेल्वे कारखाना युनिट मध्ये 154 पदे आणि विभागीय रेल्वे म्हणजेच झोन मध्ये 10730 पदे भरली जातीलअशी माहिती दिली आहे.
Railway NTPC Recruitment विभाग नुसार जागा :
- अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट =361जागा.
- कमर्शियल कम टिकट क्लर्क =1985जागा.
- जूनियर क्लर्क कम टाइपिस्ट =990 जागा.
- ट्रेन क्लर्क=68जागा.
- गुड्स ट्रेन मैनेजर=2684जागा.
- स्टेशन मास्टर=963जागा.
- चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवाइजर=1737जागा.
- जूनियर अकाउंट्स असिस्टेंट कम टाइपिस्ट=1371जागा.
- सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट =725जागा.
Railway NTPC Recruitment अर्ज फी/शुल्क :
- सामान्य/EWS /OBC साठी 500 रुपये परीक्षा फीस भरावी लागेल.
- SC/ST/महिला/माजी सैनिक /EBC/PWD उमेदवारासाठी 250 रुपये शुल्क भरावा लागेल.
परीक्षा फी/शुल्क परतावा :
सामान्य /EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना CBT 1 मध्ये उपस्तीथी नंतर 400 रु परतावा मिळेल.
SC/ST/ PWD EBC/माजी सैनिक यांना CBT 1 मध्ये उपस्तीथी नंतर 250रु म्हणजेच पूर्ण फीस परत मिळेल.