SAIL mahabharti :”स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने” 356 पदांसाठी महाभरती ची जाहिरात केली प्रसिद्ध!
SAIL Mahabharti:’स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने’ तीन वेगवेगळ्या ट्रेडसाठी महाभरतीची जाहिरात काढली आहे.
ज्यामध्ये एकूण 356 पदावर महाभरती ठेवण्यात आली आहेत, ज्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज भरले जातील.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपच्या 168 पदे ठेवण्यात आली आहेत.टेकनिशन अप्रेंटिसशिपच्या 153 जागा आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपच्या 53 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाइन अर्ज 18 सप्टेंबर पासून सुरू झाले असून शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज शुल्क /फीस :
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
वयोमर्यादा :
- या भरतीसाठी वयोमर्यादा ही , किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे ठेवली आहे.
- वयोमर्यादा ३० सप्टेंबर रोजी मोजली जाईल आणि सर्व आरक्षण श्रेणींच्या कमाल वयोमर्यादेत सवलत/सूट दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता :
या महाभरतीसाठी शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी वेगळी आहे, त्याची तपशीलवार माहिती अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आली आहे.
निवड प्रकीऱ्या :
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अप्रेंटशिप महाभरती अंतर्गत निवड ही शैक्षणिक पात्रतेच्या आधारावरती केली जाईल आणि त्यानंतर शॉर्टलिस्ट म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.
अर्ज प्रक्रिया :
- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया महाभरती 2024 अप्रेंटिस पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी पात्र आणि चूक उमेदवारांना अधिकृत जाहिरात SAIL च्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेऊन सर्व मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.
- ऑनलाईन अर्ज करताना अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय ऑनलाईन या लिंक वरती क्लिक करून विचारलेली सर्व माहिती योग्य आणि अचूक भरायचे आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे ऑनलाइन अर्जामध्ये अपलोड करावे लागतील.
- संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर प्रिंट भविष्यातील उपयोगासाठी काढून ठेवावे.
महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवाराकडे ऑनलाइन अर्ज करताना मोबाईल नंबर, चालू ई-मेल आयडी, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र म्हणून आधार ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना उमेदवाराने आपली माहिती अचूक आणि योग्य/सत्य भरावी.
- ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये भरलेली माहितीची सत्यता आणि योग्यता पडताळून पाहूनच त्यानंतर अर्ज सबमिट करावे.
जाहिरात अधिकृत PDF
ऑनलाईन अर्ज