Created by,MS 17 ऑक्टोबर 2024
नमस्कार मित्रांनो PGCIL Recruitment;म्हणजेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 117 जागा वरती महाभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय सरकारी मालकीची इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी आहे;ज्याचे मुख्यालय गुडगाव, भारत येथे आहे. पॉवरग्रिड भारतात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेपैकी सुमारे 50% वीज transmits करते.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 117 प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) आणि प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत;त्या साठी संपूर्ण लेख वाचने खूप महत्वाचे ठरणार आहे.
◊ पदाचे नाव आणि रिक्त जागांचा तपशील
अनू. क्र. | पदाचे नाव | रिक्तजागा |
1 | ट्रेनी इंजिनिअर (Electrical) | 47 |
2 | ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) | 70 |
एकूण जागा | 117 |
◊ शैक्षणिक पात्रता PGCIL Recruitment
- ट्रेनी इंजिनिअर (Electrical);B.E./ B.Tech/ B.Sc.Engg (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सिस्टीम्स अभियांत्रिकी/पॉवर अभियांत्रिकी) 60% गुण आवश्यक.
- ट्रेनी सुपरवाइजर (Electrical);डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनीअरिंग/पॉवर इंजिनिअरिंग) 70% गुणसह उतीर्ण असणे आवश्यक.
◊ वयोमार्यादा
- ट्रेनी इंजिनिअर (Electrical);पदासाठी 18 ते 28 वर्ष
- ट्रेनी सुपरवाइजर (Electrical);पदासाठी 18 ते 27 वर्ष वयोमार्यादा ठरवण्यात आली आहे.
- एससी/एसटी उमेदवार साठी 05 वर्ष सूट तर ओबीसी साठी वयोमार्यादेत 03 वर्ष सूट देण्यात आली आहे.
◊ अर्ज शुल्क
पदाचे नाव | प्रवर्ग | शुल्क |
ट्रेनी इंजिनिअर | General/OBC/EWS | 500 रुपये |
ट्रेनी सुपरवाइजर | General/OBC/EWS | 300 रुपये |
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी /माझी सैनिक यांना कोणत्याही प्रकारची फिस भरावी लागणार नाही
◊ पात्रता निकष
- GATE 2024 च्या संबंधित पेपर उमेदवार ने दिलेला पाहिजे.
- गेट 2024 ने घोषित केल्यानुसार प्राप्त गुण अनुसार ऑर्गनाइझिंग बॉडी विचार करेल.
◊ निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रियेमध्ये प्राप्त केलेल्या सामान्य गुणांचा समावेश असतो (100 पैकी)
- संबंधित GATE 2024 चा पेपर, वर्तणूक मूल्यांकन, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत.
- उमेदवारांना वर्तणूक मूल्यमापन, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत साठी शॉर्टलिस्ट केले जाईल
- उमेदवारांना मुलाखत साठी हिंदी किंवा इंग्रजी चा पर्याय असेल.
- शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार त्यांचे मुलाखत कॉल लेटर अधिकृत वेब साइड वरुण डाउनलोड करू शकतील.
◊ नोंदणी/अर्जासाठी महत्त्वाच्या सूचना
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- GATE 2024 नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती.
- तुमच्या GATE-2024 ॲडमिट कार्ड/स्कोअरमध्ये एंटर केल्याप्रमाणे तुमचे नाव आणि इतर तपशील एंटर करा
- अर्ज सादर करण्याचा इतर कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही.
- संकेतस्थळावर अर्ज नोंदवण्यापूर्वी आणि सबमिट करण्यापूर्वी उमेदवारा कडे वैध ई-मेल आयडी, पर्यायी ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरात : 1. ट्रेनी इंजिनिअर (Electrical) PDF
2.ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) PDF
ऑनलाइन अर्ज APPLY NOW
महत्वाची बातमी बँक ऑफ महाराष्ट्र भरती