NIACL RECRUITMENT: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. महाभर्ती!

NIACL RECRUITMENT: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.  170 पदांसाठी निघाली महाभरती!

NIACL RECRUITMENT म्हणजेच The New India Assurance Company Limited ने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदाच्या 170 रिक्त जागा वरती भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) द्वारे विविध इन्शुरन्स पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. याचा तपशील आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

 पदाचे नाव आणि रिक्त जागा :

  1.  ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (अकाउंट्‍स) 50 जागा.
  2.  ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जर्नालिस्ट) 120 जागा.

             एकूण     =   170 जागा.

 पदानुसार शैक्षणिक पात्रता :

  • ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (अकाउंट्‍स): या पदासाठी 60% गुणांसह  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा पास असणे आवश्यक आहे.SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नालिस्ट : या पदासाठी किमान 60% गुणासह चार्टड अकाउंट (ICAI), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ इंडिया  (ICWAI) आणि पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. SC/ST/PWD उमेदवारांसाठी किमान 55% गुणांची अट ठेवण्यात आलेली आहे.

 वयोमर्यादा :

वरील दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष असणार आहे.

SC/ST उमेदवारांना वयोमर्यादित पाच वर्ष सूट देण्यात येईल तर OBC उमेदवारांना तीन वर्षापर्यंतची सूट वयोमर्यादित देण्यात येईल.

SBI SCO recruitment: भारतीय स्टेट बँकेत 58 जागांसाठी महाभरती!

 अर्ज शुल्क किंवा फीस :

सामान्य /OBC उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

तर त्याचप्रमाणे  SC/ST/PWD 100 रुपये अर्ज फीस असणार आहे.

NIACL RECRUITMENT निवड पद्धती किंवा प्रक्रिया :

NIACL RECRUITMENT भरतीमध्ये नियुक्ती प्रक्रियेमध्ये सामान्यतः पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा  आणि मुलाखत यांचा समावेश असणार आहे.

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात त्यामध्ये इंग्रजी  बुद्धिमत्ता या विषयाचे वस्तुनिष्ठ प्रश्न  विचारले जातात.

पूर्व आणि मुख्य परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

  पूर्व परीक्षा दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येईल.

मुख्य परीक्षा 17 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.

MSRTC Mumbai recruitment 2014 : एसटी महामंडळात  मेगा भरतीची संधी!

 अर्ज प्रक्रिया किंवा एप्लीकेशन प्रोसेस :

NIACL RECRUITMENT भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार  NIACL च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

त्यानंतर प्रवर्गानुसार ऑनलाइन चलनाद्वारे अर्ज फी भरावी लागेल.

NIACL अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची 29 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख असणार आहे.

 परीक्षा प्रवेश पत्र :

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरलेल्या उमेदवारातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षेसाठी चे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईट द्वारे पात्र उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाईल.

परीक्षेसाठी हजर राहताना प्रवेश पत्राची प्रिंट काढून सोबत ठेवणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top