कामगार कल्याण शिष्यवृत्ति योजना Maharastra Kamgar Kalyan Scholarship Yojana:
कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेली एक योजना आहे.या अंतर्गत बांधकाम कामगार च्या परिवारातील मुलांना कामगार कल्याण शिष्यवृत्ति योजना ( Maharastra Kamgar Kalyan Scholarship Yojana) या अंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जात आहे.
कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती योजना, परदेशांतील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना, आणि बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अंतर्गत, कामगार कल्याण विभाग बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना आर्थिक सहाय्य प्रदान करते, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाते.Maharastra Kamgar Kalyan Scholarship Yojana.
महाराष्ट्र कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, शिवण यंत्र अनुदान योजना, बांधकाम कामगार प्रथम विवाह योजना अशा इतर योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत.
तुम्हालाही कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर पुढे दिलेली माहिती शेवटपर्यंत वाचावी लागेल.या लेखात आपण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत.जेणे करून कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हे माहिती करून घेता येईल.
कामगार कल्याण शिष्यवृत्ती म्हणजे काय? हे जाणून घेऊयात:
Kamgar Kalyan Scholarship Yojana महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ द्वारे महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली योजना आहे. ज्या अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात बांधकाम कामगारांची मुले गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही गोस्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाअंतर्गत कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम कामगार योजना लाभार्थी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. या योजनेअंतर्गत अंतर्गत क्रीडा शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती योजना आणि परदेशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना आहेत.
बांधकाम कामगार क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कुटुंबातील मुलांनी राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक खेळांमध्ये प्रथम/द्वितीय/तृतीय क्रमांक प्राप्त केल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
याशिवाय, परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी करत असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
- महाराष्ट्र कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत, इयत्ता पहिली ते इयत्ता 7 वी पर्यंत 2,500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
- इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या कामगार कुटुंबातील विद्यार्थ्याला प्रतिवर्ष 5,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजने साठी पात्रता:
- बांधकाम कामगार योजनेत अर्ज दराने नोंदणी केलेली असावी.
- बांधकाम कामगाराचा मुलगा किंवा मुलगी शाळा किंवा महाविद्यालयात शिकत असला पाहिजे.
- अर्जदार हा महाराष्ट्र चा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- लाभा घेणारे विद्यार्थ्याचे पालक बांधकाम कामगार असावे लागतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची शाळेतील उपस्थिती ७५% किंवा त्यापेक्षा जास्त असने अनिवार्य आहे.
कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना साठी पुढली कागदपत्रे असणे आवश्यक आहे :
- बांधकाम कामगार नोंदणी प्रमाण पत्र.
- आधार कार्ड.
- उत्पनाचा दाखला.
- रहिवाशी दाखला.
- शैक्षणिक कागद पत्र.
- शाळेतील हजेरी पत्र.
- शाळा/ विदयापीठ दाखले.
- राशन कार्ड.
- बँक खाते पासबुक.
- मागच्या वर्षाचे मार्क मेमो.
महाराष्ट्र कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा :
महाराष्ट्र कामगार कल्याण च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
महाराष्ट्र कामगार कल्याण शिष्यवृत्ती योजना GR PdF