कोतवलांच्या मानधनात वाढ! शासनाने काढला नवीन आदेश . Maharashtra new Gr

Created by ,Mahi 07,ऑक्टोबर 2024

नमस्कार वाचक मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल ओवन विभागाने एक महत्त्वाचा जीआर GR म्हणजेच शासन निर्णय Maharashtra new Gr  काढला आहे.

कोतवलांच्या मानधनात वाढ!

कोतवलांच्या मानधनात वाढ! शासनाने काढला नवीन आदेश . Maharashtra new Gr

 

महत्वाची बातमी, महाराष्ट्राने कोतवालांच्या मानधन वाढ करणे बाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच जीआर महाराष्ट्र वन विभाग  याच्या बैठकीत घेतला आहे.

काय आहे  महत्त्वाचा जीआर

महाराष्ट्र राज्यातील एकूण 12,793 कोतवालांना दिनांक 6 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयाचा अनुसरून सध्या लागू असलेले दर महा 15000 इतक्या मानधनांमध्ये एक एप्रिल 2023 रोजी पासून दहा टक्के इतकी वाढ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच एक एप्रिल पासून त्यांना मिळणारे एकूण मानधनांपैकी दहा टक्के इतकी वाढ देण्यास या सदस्य निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्यातील कोतवालांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये त्याची प्रमुख मागणी ही होती की चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी.Maharashtra new Gr

कोतवालाना चतुर्थ श्रेणीमध्ये लागू करण्यात आली व इतर मागण्यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक ३ जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या त्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत 28 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीतील शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने 30 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेऊन कोतवालांच्या मानधनात वाढ केल्याचे जाहीर केले आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील एकूण 12000 पेक्षा जास्त कोतवालांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे कोतवालांची दसरा आणि दिवाळी गोड होणार आहे.

तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शासन निर्णय म्हणजे त्याची आर डाऊनलोड करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी या वेबसाईटला फॉलो करा.

धन्यवाद……..

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!