Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:” भारतीय नोसेना ” महाभरती!

Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:” भारतीय नौसेना” महाभरती!लवकर करा अर्ज

 

Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024:भारतीय नौसेना मध्ये SSR वैद्यकीय सहाय्यक महा भरती 2024 साठी जाहिरात आली आहे, लवकर अर्ज करान्यासाठी जाणून घेऊयात पात्रता, अर्जाच्या तारखा आणि महत्त्वाच्या लिंक.

या जाहिराती मुळे युवकांना मिळणार भारतीय नौदलातील आपल्या करिअरची सुरुवात करन्याची मोठी संधी!

भारतीय नौदलाने SSR वैद्यकीय सहाय्यक भरती 2024 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.ज्या मुळे भारतीय सेनेतील प्रतिष्ठित नौदलात सामील होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती जाहिरातीचा उद्देश वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा भरणे  हा आहे. जे भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ राखण्यासाठी महत्त्वपूर्ण  ठरणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाचे निकष पूर्ण करणारे आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ही महा भरती आरोग्यसेवेची आवड असलेल्या युवकांना आव्हानात्मक आणि पोषक वातावरणात मौल्यवान अनुभव मिळवून आपल्या देशाची सेवा करण्याची अनोखी संधी देते.

निवड पद्धती /प्रकीऱ्या :

  • लेखी परीक्षा. ( written examination)
  • शारीरिक क्षमता चाचणी.(physical fitness test)
  • वैद्यकीय चाचणी.(medical examination)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

मान्यता प्राप्त संस्थेतून आणि बोर्डतून 10+2 म्हणजेच विज्ञान  शाखेतून Physics+ Chemistry+ Biology या विषय सह  12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा( Age Limit):

Indian Navy SSR Medical Assistant Recruitment 2024 साठी उमेदवाराचे वय 👉 हे 17 ते 20 वर्षाच्या दरम्यान असायला हवे.

शासन नियमानुसार वयोमर्यादेत वेळो वेळी सूट दिली जाईल.

अर्ज शुल्क  /फीस(Application Fees) :

  • सामान्य /OBC /EWS उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • SC/ST उमेदवारांना फीस माफ करण्यात आली आहे.

जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख :

28 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नौदल SSR वैद्यकीय सहाय्यक भर्ती 2024 साठी जाहिरात काढण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज 7 सप्टेंबर 2024 रोजी पासून करता येतील.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट ची तारीख 17 सप्टेंबर 2024 राहणार आहे.

आवश्यक कागद पत्र :

  1. 10/12 वी ची प्रमाण पत्र.
  2. राहिवाशी दाखला.(डोमासाईल सर्टिफिकेट )
  3. पासपोर्ट फोटो.
  4. आधार कार्ड.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

भारतीय नौदलाने SSR वैद्यकीय सहाय्यक भरती 2024 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून त्यात दिलेल्या APLLY ऑनलाईन लिंक द्वारे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top