Created by Mahi, 04 ऑक्टोबर 2024.
नमस्कार वाचक मित्र हो, कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी plb bonus news कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर! PLB BONUS NEWS सरकारकडून दसऱ्याच्या आधी एक खुशखबर देण्यात आली आहे.
याची सविस्तर माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत. काय आहे खुशखबर हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.plb bonus news
कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर! PLB BONUS NEWS
मित्रहो केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
काय आहे महत्त्वाची घोषणा
केंद्र सरकारने केंद्रीय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसाचा पी एल बी बोनस जाहीर केला आहे.
या कॅबिनेट मीटिंगमध्ये केंद्रीय मंत्र्याने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसाचा प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस जाहीर केला आहे.employee news
त्यामुळे हे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याच्या आधी आलेली एक मोठी खुशखबर आहे.
किती मिळणार बोनस
पी एल बी बोनस बाबत बाबत सविस्तर माहिती अशी की रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाच्या सेलिंगनुसार दिवाळी बोनस दुर्गा पूजेच्या आधी म्हणजेच दसऱ्याच्या आधी दिला जातो.
रेल्वे कर्मचाऱ्यांना सहाव्या पे कमिशनुसार 7000 मूळ पगारावर सेलिंग लावून 78 दिवसाचा बोनस म्हणजेच 17951 रुपये दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाने जाहीर केली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांची मागणी
तरी घोषणा झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांतून मोठ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की सातवा वेतन आयोग लागू असताना प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोना सहाव्या वेतन आयोगानुसार का दिला जातो.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की 7 th pay कमिशन नुसार कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन 18 हजार आहे तर मग 18000 मूळ वेतनानुसार बोनस हा 46158 रुपये दिला गेला पाहिजे. 7th pay Commission
काय आहे बोनस देण्याचा फॉर्म्युला
- सातव्या वेतन आयोगानुसार
- 7000×12=84000
- 84000÷365=230.13 एक दिवसाचा पगार
- त्या नुसार 78 दिवसाचा पगार म्हणजे
- 230.13×78=17950.68 रुपये बोनस दिला जातो.
- सातव्या वेतन आयोगानुसार होणारा बोनस
- 18000×12=216000
- 216000÷365=591.78
- 591.78×78=46158 रुपये बोनस मिळाला पाहिजे.8th Pay Commission news
2024 नेमका बोनस किती
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ७८ दिवसांच्या पीएलबीचे रु. 11,72,240 रेल्वे कर्मचाऱ्यांना 2028.57 कोटी. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ हेल्पर, पॉइंट्समन, मंत्री कर्मचारी आणि इतर ग्रुप C कर्मचारी यांसारख्या विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना 17951 ही रक्कम दिली जाईल.
PLB चे पेमेंट हे रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या दिशेने काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून कार्य करते.
पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना PLB चे पेमेंट दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी केले जाते. यावर्षी देखील, सुमारे 11.72 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी PLB रक्कम दिली जात आहे.
78 दिवसांसाठी प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला देय असलेली कमाल रक्कम रु.17,951/- आहे.
वरील रक्कम विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचारी जसे ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ हेल्पर, पॉइंट्समन, मंत्री कर्मचारी आणि इतर गट ‘क’ कर्मचारी यांना अदा केली जाईल.
2023-2024 या वर्षात रेल्वेची कामगिरी खूप चांगली होती. रेल्वेने 1588 दशलक्ष टनांचा विक्रमी माल लोड केला आणि जवळपास 6.7 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली. Employee news
या विक्रमी कामगिरीमध्ये अनेक घटकांचा हातभार लागला.