ठाणे महानगरपालिका कंत्राटी भरती :TMC recruitment 2024
TMC recruitment 2024:ठाणे महानगरपालिका ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ओटी असिस्टंट, नाई, ड्रेसर, वॉर्ड बॉय, हॉस्पिटल अय्या, पोस्टमॉर्टम अटेंडंट, शवागार परिचर या पदांसाठी 63 रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव आणि रिक्त जागा :
पद क्र. | पदाचे नाव | रिक्तजागा |
1 | शस्त्रक्रिया सहाय्यक | 15 |
2 | न्हावी | 02 |
3 | ड्रेसर | 10 |
4 | वार्ड बॉय | 11 |
5 | दवाखाना आया | 17 |
6 | पोस्टमार्टम अटेंडंट | 04 |
7 | मॉच्युरी अटेंडंट | 04 |
एकूनजागा | 63 |
शैक्षणिक पात्रता:
- शस्त्रक्रिया सहाय्यक: विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण, ओटी टेक्नॉलॉजी डिप्लोमा आणि तीन वर्ष अनुभव.
- न्हावी : इत्या दहावी उत्तीर्ण आणि तीन वर्ष अनुभव.
- ड्रेसर : दहावी उत्तीर्ण, आयटीआय ड्रेस सर आणि तीन वर्षाचा अनुभव.
- वॉर्ड बॉय : दहावी उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव.
- दवाखाना आया : दहावी उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव.
- पोस्टमार्टम अटेंडंट: इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव.
- मॉच्युरी अटेंडंट : दहावी उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा :
वरील सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आलेली आहे.
एससी एसटी ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची सूट शासन नियमाप्रमाणे देण्यात येईल.
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क किंवा फी साकारली जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज हा विनाशुल्क भरता येणार आहे.
निवड प्रक्रिया :
ठाणे महानगरपालिका कंत्राटी पदभरती अंतर्गत निवड प्रक्रिया आहे थेट मुलाखती द्वारे करण्यात येईल.
मुलाखतीचे ठिकाण :
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अनुप कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे 400 602!
मुलाखतीच्या तारखा:
या भरतीसाठी मुलाखती 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येईल.
महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे मुलाखतीच्या वेळी दोन प्रतीमध्ये सोय साक्षांकित किंवा प्रमाणित करून सादर करावीत.
- जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्थ धारण करत नसलेल्या उमेदवार मुलाखतीस पात्र ठरणार नाहीत.
- शैक्षणिक पात्रता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापना वरील वर दिलेल्या संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी भरती करण्यात येणार आहेत.
हे ही अवश वाचा ,स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने 356 पदांवर महाभरती!