ITBP Driver recruitment :545 कॉन्स्टेबल पदावर महाभरती!

ITBP Driver recruitment :545 ड्राइवर कॉन्स्टेबल पदावर निघाली महाभरती!

ITBP Driver recruitment 545 कॉन्स्टेबल पदांसाठी  ITBP ने 2024 साठी काढली महाभरतीची  जाहिरात , ऑनलाइन अर्ज कसा करावा घेऊ संपूर्ण माहिती.

ITBP म्हणजेच indo-Tibetan Border Police ने कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी 545 जागा वरती महाभरतींची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रोजगार एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये  प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत जाणून घेऊयात संपूर्ण आणि विस्तारित माहिती.

SSC GD ADMIT CARD 

ITBP Driver recruitment 2024 कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी ऑनलाईन अर्ज 8 ऑक्टोबर 2024 पासून करण्यास सुरुवात होणार आहे तर शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.

ITBP Driver recruitment शैक्षणिक  पात्रता:

  • Itbp कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी मान्यता प्राप्त संस्थेतून इत्यादी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अवजड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच HMV driving  License असणे गरजेचे आहे.

 वयोमर्यादा :

कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराचे वय मर्यादा 21 ते 27 वर्ष ठेवण्यात आलेली आहे.

ही वयोमर्यादा मोजण्या साठी महत्त्वाची तारीख 06, नोव्हेंबर 2024 आहे.

स्वस्त आणि नियत केलेल्या नियमानुसार वेगवेगळ्या प्रवरार्थी उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गानुसार वय मर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल.

 प्रवर्गानुसार रिक्त जागा :

  • सामान्य (UR)= 209 जागा.
  • SC= 77 जागा.
  • ST=40 जागा.
  • OBC=140 जागा.
  • EWS= 55 जागा.

 अर्ज शुल्क /फीस :

सामान्य/EWS/OBC प्रवर्गासाठी शंभर रुपये अर्ज शुल्क/ फीस भरावे लागणार आहे.

SC/ST/ESM प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आलेला आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही.

 निवड प्रक्रिया म्हणजेच सिलेक्शन प्रोसेस:

ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर महाभर्ती 2024 साठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे/मुद्दे समाविष्ट आहेत:

  1. PET( फिजिकल एफिशियन्सी टेस्ट )
  2. PST( फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट )
  3.  लेखी परीक्षा
  4.  कागदपत्र पडताळणी.
  5.  स्किल टेस्ट किंवा ड्रायव्हिंग टेस्ट
  6.  वैद्यकीय चाचणी

 ऑनलाइन अर्ज कसा करावा :

  •  सर्वप्रथम आपली शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीमध्ये दिलेली पात्रता यांची तुलना करून आपण पात्र आहोत का हे तपासून घ्यावे.
  •  त्यानंतर ITBP च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन  ऑनलाईन नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  •  रजिस्ट्रेशन केल्यानंतर आलेल्या आयडिया आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करून ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावा.
  •  ऑनलाइन अर्ज मध्ये सर्व माहिती अचूक भरावी आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  •  प्रवर्गानुसार ठरवलेली अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा.
  •  हे सर्व माहिती भरल्यानंतर आपलिकेशन सबमिट करावे.
  •  एप्लीकेशन सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रत किंवा प्रिंट पुढील कार्यशाळेसाठी आपल्याकडे काढून ठेवावे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06, नोव्हेंबर 2024 आहे.

अधिकृत जाहिरात

 👉ऑनलाइन अर्ज 

 🌎अधिकृत वेबसाईट 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top