PPF च्या ‘ट्रिपल 5’ फॉर्मूल्याने 1.5 कोटींचा निधी तयार करा. PPF Tripal Formula 

PPFच्या ‘ट्रिपल 5’ फॉर्मूल्याने 1.5 कोटींचा निधी तयार करा. PPF Tripal Formula 

PPF Tripal Formula : नमस्कार मित्रानो केंद्र सरकारने चालू आर्थिक तिमाहीसाठी (एप्रिल-मे-जून 2025) PPF (पब्लिक प्रोविडेंट फंड) साठी 7.1% वार्षिक व्याजदर निश्‍चित केला आहे. ही योजना विशेषतः सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी उपयुक्त आहे.

🔁 ट्रिपल 5 फॉर्म्युला म्हणजे काय? PPF Tripal Formula

PPF खाते सुरूवातीला 15 वर्षांसाठी उघडले जाते. त्यानंतर खाते तीनदा 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवता येते. याच प्रक्रियेला “ट्रिपल 5” असे म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीने 28 व्या वर्षी PPF खाते सुरू केले आणि दरवर्षी त्यात ₹1.5 लाख जमा केले, तर 30 वर्षांमध्ये एकूण ₹45 लाख गुंतवणूक होईल. सध्याच्या 7.1% दराने त्याला व्याजासह एकूण ₹1.54 कोटी इतका फंड मिळू शकतो. यामध्ये सुमारे ₹1.09 कोटी ही व्याजाची रक्कम असेल.

महाराष्ट्रात आता जुनी ७/१२ उतारे, फेरफार, नकाशे ऑनलाईन पाहता येणार. Property Update news.

विस्ताराचे फायदे. PPF Tripal Formula 

PPF खाते 15 वर्षांनंतर 5 वर्षांच्या कालखंडात तीनदा वाढवता येते. या विस्तारादरम्यान देखील संपूर्ण रक्कम करमुक्त राहते. विशेष म्हणजे, या वाढीच्या कालावधीत जमा झालेले व्याज निघवून मासिक उत्पन्न मिळवता येते. उदाहरणार्थ, ₹1.5 कोटी रकमेवर 7.1% दराने वार्षिक व्याज ₹10.65 लाख इतके मिळते, जे सरासरी ₹88,750 प्रति महिना करमुक्त उत्पन्न मिळवण्यास पुरेसे ठरते.

PPF खाते सरकारकडून चालवले जात असल्याने पूर्णतः सुरक्षित असते. या योजनेला EEE (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे, म्हणजेच गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि अंतिम परिपक्वतेवरील रक्कम – तिन्ही गोष्टी पूर्णपणे करमुक्त असतात.

PPF गुंतवणुकीसाठी आवश्यक मुद्दे. PPF Triple Formula 

  1. PPF खात्यात दरवर्षी किमान ₹500 आणि कमाल ₹1.5 लाख इतकी गुंतवणूक करता येते.
  2. प्रत्येक तिमाहीत व्याजदर बदलू शकतो. सध्या (एप्रिल-जून 2025) 7.1% दर लागू आहे.
  3. 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खाते वाढवण्यासाठी “फॉर्म H” भरावा लागतो, विशेषतः जर तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करायची असेल तर.

1 कोटी 15 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!वाट पाहावी लागणार? pay commission Updates

निष्कर्ष…..

जर तुम्ही PPF मध्ये सातत्याने दरवर्षी ₹1.5 लाख गुंतवले आणि 15 वर्षांनंतर तीनदा 5 वर्षांसाठी खाते वाढवले, तर तुम्हाला एकूण 30 वर्षांत ₹1.5 कोटींचा निधी मिळू शकतो. हा फंड पूर्णतः करमुक्त असून, वृद्धावस्थेसाठी किंवा रिटायरमेंटसाठी मासिक उत्पन्नाचा स्थिर स्रोत होऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!