बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये लिपिक पदासाठी महाभरती, आली जाहिरात. BMC Clerk Receuitment 2024
BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 1846 रिक्त कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत BMC clerk recruitment 2024 साठी अधिकृत वेबसाइट https://www.mcgm.gov.in/ वर अर्ज करू शकतात.
दरवर्षी प्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वर्षी देखील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात (नोटिफिकेशन) काढली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांची पात्रता तपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. BMC clerk recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया २० ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून ही प्रकीऱ्या ०९ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.
पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन BMC लिपिक जाहिरात 2024 डाउनलोड करून, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यांची पात्रता तपासून , त्यानंतरच BMC Recruitment 2024 साठी अर्ज करावा.
BMC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता :
- BMC भर्ती २०२४ साठी अर्ज करणारे उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असला पाहिजे.
- 10 वी पास यासोबतच कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- अधिक माहितीसाठी, अधिकृत जाहिरात डाउनलोड करून वाचावी.
BMC Recruitment 2024 अर्ज शुल्क /फीस :
BMC लिपिक भर्ती 2024 अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क/फीस देखील भरावे लागेल. ज्याचा तपशील खाली प्रमाणे दिला आहे.
- सामान्य (GEN )/OBC /EWS प्रवर्गासाठी 1000/ रुपये.
- SC/ST/PWD/महिला /माझी सैनिक या सर्वा साठी 900/ रुपये.
BMC Recruitment 2024 वयोमर्यादा:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने लिपिक भरती २०२४ च्या कार्यकारी सहाय्यक पदांसाठी किमान वय १८ वर्षे ठेवले आहे तर कमाल वय ३६ वर्षे ठरवले आहे. पात्र उमेदवारांना शासनाने विहित केलेल्या वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
BMC Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज कसा करावा :
बृहमुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांच्या भरतीसाठी जी जाहिरात काढली आहे, त्याअंतर्गत 1846 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार BMC लिपिक भरती २०२४ साठी खाली दिलेल्या पद्धतीने online अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम Bmc लिपिक भरती 2024 च्या अधिकृत वेबसाइट वर जावे.
- मुख्यपृष्ठावर latest recruitment पर्याय पहा.
- आता BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिक्रूटमेंट 2024 लिंकवर क्लिक करा.
- नवीन पृष्ठावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर ऑनलाइन अर्जावर क्लिक करा.
- नंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर, BMC Clerk Recruitment 2024 साठी लागणारी अर्ज फी भरा.
- फायनल सबमिट वर क्लिक करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या जी भविष्यातील कारवाही साठी आवश्यक आहे.