NSP scholarship: “सरकार देणार विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये शिष्यवृत्ती”

NSP scholarship : “सरकार देणार सर्व विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये शिष्यवृत्ती!”

NSP Scholarship अंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये शिष्यवृत्ती देणार आहे. जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.

NSP scholarship म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) हे विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज करण्याचा भारत सरकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे.

एन एस पी हे पोर्टल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठीच्या खर्च भागवण्यासाठी मदत करते. जेणेकरून विद्यार्थी शिक्षण चालू ठेवतील.

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत शासनाने राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजेच एन एस पी सुरू केले आहे. हे एक ऑनलाईन पोर्टल आहे जे विद्यार्थ्यांना विविध सहकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी देते.

याच्या माध्यमातून शासन विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या हे कमकुवत आहेत अशा विद्यार्थ्यांना मदत पुरविण्याचे कार्य शासन करते. एन एस पी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रुपये 75 हजार पर्यंतची मदत शासन अभ्यासाचा खर्च सहज भागवता यावा यासाठी पुरवत

NSP scholarship  साठी  अर्ज कसा करावा?

जर आपण नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती घेऊ इच्छित असाल तर काही नियम व अटींचं पालन करणे आवश्यक आहे ज्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

  •  शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आणि अनिवार्य आहे.
  •  अर्जदार हा मान्यताप्राप्त शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिकत असणे आवश्यक आहे.
  •  यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  •  महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा व्यक्तीला सरकारी नोकरी नसावी.

 अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे :

  1.  आधार कार्ड.
  2. उत्पन्नाचा दाखला.
  3.  रहिवाशी किंवा अधिवास प्रमाणपत्र.
  4.  कास्ट सर्टिफिकेट किंवा जात प्रमाणपत्र.
  5.  आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते.
  6.  चालू ई-मेल आयडी.
  7.  पासपोर्ट साईज फोटो.
  8.  मोबाईल नंबर.

NSP Scholarship मिळवण्यासाठी Online अर्ज कसा करावा?

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करणे सरळ आणि सोपे आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा याची तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

  •  सर्वप्रथम नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या अधिकारी वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे.
  •  त्यानंतर  वेबसाईटच्या होम पेज वरती स्टुडन्ट वरती क्लिक करावे.
  •   अप्लाय फॉर स्कॉलरशिप  ( apply for scholarship) या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी  शिष्यवृत्ती फॉर्म भरावा.
  •  सर्व माहिती अचूक भरल्यानंतर ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
  •  नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपणाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल.
  •  मिळालेल्या पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन आयडी द्वारे लॉगिन करून शिष्यवृत्ती अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती अचूक अचूक भरावी.
  •  त्यानंतर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी.
  •  सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट करून भरलेल्या फॉर्म ची सुरक्षित ठेवावी.

अधिकृत वेबसाईट 

Konkan Railway recruitment 2024 : कोकण रेल्वेत 190 पदांसाठी मेगा भरतीची आली जाहिरात!

Leave a Comment

error: Content is protected !!